तळेगावातील ड्रेनेजलाइन दुरुस्तीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावातील ड्रेनेजलाइन 
दुरुस्तीची मागणी
तळेगावातील ड्रेनेजलाइन दुरुस्तीची मागणी

तळेगावातील ड्रेनेजलाइन दुरुस्तीची मागणी

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. ११ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कुंभार आळीतील फुटलेली ड्रेनेज लाईन त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी येथील शेतकरी जब्बार इनामदार व स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
येथील कुंभारआळीतून वेळ नदीपात्रात ग्रामपंचायतीची ड्रेनेजलाइन नेण्यात आली असून, सदर ड्रेनेज लाईनचा पाइप नदीपात्राच्या कडेला फुटल्याने सर्व सांडपाणी रस्त्यावरून नदी पात्रातील खड्ड्यात साठत आहे.
सदर सांडपाण्याचा उपद्रव विद्यार्थी व ग्रामस्थांना तसेच न्हावरे व कासारी फाट्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे. त्वरित दखल घेऊन फुटलेली ड्रेनेज लाईन त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी इनामदार यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
दरम्यान, या संदर्भात ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, इनामदार व ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची त्वरित दखल घेऊन कुंभार आळीतील नदीपात्रात फुटलेली ड्रेनेज लाईन त्वरित दुरुस्त केली जाईल.

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01570 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top