
करंजावणे येथे पिंजरा लावण्याची मागणी
तळेगाव ढमढेरे, ता. १३ : करंजावणे (ता. शिरूर) येथील मैंद वस्ती, शिंदे मळा, कुदळे वस्ती, इंगळेनगर आदी परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून, विविध वस्तीवरील पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने पत्राद्वारे केली आहे.
शेतातील वावराबरोबरच आता बिबट्याचा लोकवस्तीवर वावर दिसून येत आहे. शेतात अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे, आता दररोज बिबट्या लोकवस्तीवरील नागरिकांना दिसत असल्याने भीतीचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना अंधारात शेतातील कामे करावी लागत आहेत. तसेच ग्रामस्थ, नागरिक, शेतमजूर, कामगार, महिला या सर्वांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वारंवार वनविभागाला कल्पना देऊनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केले असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. वनविभागाने परिसराची पाहणी करून त्वरित पिंजऱ्याची व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी ग्रामपंचायत व नागरिकांनी केली आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01577 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..