
विठ्ठलवाडीत निळोबारायांचा प्रकटदिनी विविध कार्यक्रम
तळेगाव ढमढेरे, ता.१५ : श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे पांडुरंग भजनी मंडळ आयोजित श्री संत तुकाराम महाराज यांचे शिष्य श्री संत निळोबारायांचा "पांडुरंग परमात्मा प्रकटदिन" उत्साहात साजरा झाला. यावेळी अभिषेक व आरती तसेच श्री विठ्ठल- रुक्मिणीचा अभिषेक व आरती आणि सवाद्य दिंडी ग्रामप्रदक्षिणा आदी विविध कार्यक्रम पार पडले.
भीमा नदीच्या तीरावर ज्ञानेश्वर महाराज भोपळे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. येथील युवा उद्योजकांकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री संत निळोबारायांचे वंशज गोपाळकाका मकाशीर, मोहनानंद पुरंदवडेकर, संत निळोबाराय सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अशोक सावंत, आमदार ॲड. अशोक पवार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष निवृत्तीआण्णा गवारी, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच संत निळोबाराय भजनी मंडळ (पिंपळनेर), श्रीराम भजनी मंडळ (टाकळी भीमा), रायबा भजनी मंडळ (मेमाणवाडी), हनुमान भजनी मंडळ (दरेकरवाडी), श्रीनाथ भजनी मंडळ (न्हावी सांडस), पांडुरंग भजनी मंडळ (विठ्ठलवाडी) यांनी दिवसभर टाळमृदंगाच्या गजरात भजन करून सेवा दिली. रात्री हरिपाठ व कीर्तन झाले.
03257
Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01581 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..