तळेगाव ढमढेरे सोसायटीत भैरवनाथ पॅनेलची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव ढमढेरे सोसायटीत भैरवनाथ पॅनेलची बाजी
तळेगाव ढमढेरे सोसायटीत भैरवनाथ पॅनेलची बाजी

तळेगाव ढमढेरे सोसायटीत भैरवनाथ पॅनेलची बाजी

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. ३० : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री भैरवनाथ (मुळोबा) जय मल्हार सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकून अनेक वर्षांची सत्ता कायम ठेवली आहे. तर विरोधी शेतकरी संघटना आणि समविचारी आघाडी पुरस्कृत बळिराजा सहकार परिवर्तन पॅनेलला एकही जागा न मिळाल्याने त्यांच्या पदरी अपयश आले आहे. रविवारी झालेल्या निवडणुकीत १६२१ पैकी ११९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १३ जागांसाठी एका अपक्षासह २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शंकर कुंभार, गजानन पुंड, कैलास लोहार व सचिन बाळसराफ यांनी काम पाहिले.
विजयी झालेले सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी व त्यांची मते ः बाळासाहेब लक्ष्मण ढमढेरे (६३६), रामभाऊ नारायण ढमढेरे (६३६), विजय किसनराव ढमढेरे (६४४), संतोष विजय ढमढेरे (५८५), पोपट रामदास भुजबळ(५९४), विजय लक्ष्मण भुजबळ(६२१), शिवाजी धोंडिबा भुजबळ(५८६) व श्रीपती उत्तम भुजबळ (६१९).
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी:- दशरथ बबन शेलार(६९०). महिला प्रतिनिधी :- कमल बबन भुजबळ( ६५६) व पुष्पा अर्जुन भुजबळ(६६९). इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :- ज्ञानोबा रंगनाथ भुजबळ (६५६). भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग :- राजेंद्र काळूराम घुमे (६९६).
सर्व विजयी संचालकांचा सत्कार आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, बाजार समितीचे माजी उपसभापती ॲड यशवंत ढमढेरे, माजी उपसभापती अनिल भुजबळ, संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष सुदीप गुंदेचा, माजी अध्यक्ष श्रीकांत सातपुते, ॲड. संपत ढमढेरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी उपसभापती विश्वासकाका ढमढेरे, घोडगंगा कारखान्याचे संचालक बाळासाहेब ढमढेरे, जिल्हा दूध संघाचे संचालक ऍड. स्वप्नील ढमढेरे, माजी सरपंच स्वप्नील गायकवाड, रमेश भुजबळ, बाळासाहेब लांडे, विजयकाका ढमढेरे, शहाजीकाका ढमढेरे, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, गोविंद ढमढेरे, माजी अध्यक्ष संदीप ढमढेरे, निवृत्ती जकाते, महेंद्र पिंगळे, पांडुरंग नरके व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आमदार अशोक पवार म्हणाले, ‘‘गावच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकी दाखवून गावचा नियोजनबद्ध विकास करा, सहकार चळवळीचे महाराष्ट्राला मोठे योगदान असून सहकार टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.’’
3315

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01606 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top