धानोरे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी येवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धानोरे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी येवले
धानोरे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी येवले

धानोरे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी येवले

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता.३१ : धानोरे (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सदस्यपदाच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत वैशाली हरीश येवले यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत सदस्या पूनम प्रदीप भोसुरे यांनी राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. या जागेसाठी वैशाली हरीश येवले आणि सारिका ज्ञानेश्वर थेऊरकर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. परंतु सारिका थेऊरकर यांनी अर्ज मागे घेतल्याने वैशाली येवले यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत नवले, पंचायत समिती सदस्या अर्चना भोसुरे, माजी सरपंच भरत भोसुरे, माजी उपसरपंच भानुदास भोसुरे, सरपंच कालिदास झगडे, उद्योजक हरीश येवले, ग्रामपंचायतीचे आजी- माजी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

03322

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01609 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top