
तळेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी पोपट भुजबळ
तळेगाव ढमढेरे, ता. १७ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी पोपट भुजबळ आणि उपाध्यक्षपदी राजेंद्र घुमे यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, २९ मे २०२२ रोजी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होऊन या निवडणुकीत श्री भैरवनाथ (मुळोबा) जय मल्हार सहकार पॅनेलने सर्व १३ जागा जिंकून बहुमत मिळवले होते. अध्यक्षपदासाठी पोपट भुजबळ आणि उपाध्यक्षपदासाठी राजेंद्र घुमे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, बाजार समितीचे माजी उपसभापती यशवंत ढमढेरे, अनिल भुजबळ व विश्वास ढमढेरे, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, संदीप ढमढेरे, शहाजी ढमढेरे, महेंद्र पिंगळे, वसंत भुजबळ, योगेश ढमढेरे, सुनील ढमढेरे, दादाभाऊ सिनलकर आदींसह विजय ढमढेरे, बाळासाहेब ढमढेरे, रामभाऊ ढमढेरे, विजय भुजबळ, श्रीपती भुजबळ, शिवाजी भुजबळ, संतोष ढमढेरे, दशरथ शेलार, पुष्पा भुजबळ, कमल भुजबळ व ज्ञानोबा भुजबळ हे संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शंकर कुंभार, सचिव कैलास लोहार व मदतनीस सचिन बाळसराफ यांनी काम पाहिले.
Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01641 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..