विद्यार्थ्यांना माती परीक्षण शिकविण्याची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांना माती परीक्षण शिकविण्याची गरज
विद्यार्थ्यांना माती परीक्षण शिकविण्याची गरज

विद्यार्थ्यांना माती परीक्षण शिकविण्याची गरज

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता.१० : नवीन तंत्रज्ञान हे मानवी कल्याणासाठी आहे. भविष्यकाळात विद्यार्थ्यांना मातीचे परीक्षण व मातीचे आरोग्य शिकवण्याची गरज आहे. तापमान बदलाचे परिणाम वेगाने होत असून भविष्यकाळात कोळसा व नैसर्गिक गॅस संपणार आहे. सूर्याचा प्रकाश सोडून ऊर्जेचे कोणतेच साधन उपलब्ध राहणार नाही. भविष्यात काळात सौरऊर्जेला विशेष महत्त्व येणार आहे, असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिरचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश थोरात यांच्या सेवापूर्तीनिमित्त गौरव समारंभप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष निवृत्तिअण्णा गवारी अध्यक्षस्थानी होते.यावेळी सुरेश थोरात यांचा सेवापूर्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांच्या सन्मानपत्राचे वाचन प्रा. संदीप गवारी यांनी केले.

यावेळी श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक काळुराम गवारी, लक्ष्मण गवारी, श्रीहरी गवारी, सरपंच शंकर धुळे, उपसरपंच ज्योती गवारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक संभाजी गवारी, माजी उपसरपंच सोपान गवारी, राहुल गवारी, जयेश शिंदे, दिलीप गवारी, महेंद्र गवारी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी दादासाहेब गवारी आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी प्रस्ताविक केले.
03482

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01680 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..