खंडाळे ग्रामपंचायतीचे दोन सदस्य अपात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडाळे ग्रामपंचायतीचे दोन सदस्य अपात्र
खंडाळे ग्रामपंचायतीचे दोन सदस्य अपात्र

खंडाळे ग्रामपंचायतीचे दोन सदस्य अपात्र

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. १७ : खंडाळे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीचे सदस्य ज्योती मारुती नरवडे आणि अमोल रामचंद्र नरवडे यांनी "सरकारी जागेवर अतिक्रमण" केल्याने त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१), (ज-३) अन्वये जिल्हाधिकारी पुणे यांनी दोन्ही सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.
याबाबत तेजस संपत नरवडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदाराचा अर्ज मान्य केला असून, ज्योती नरवडे व अमोल नरवडे या दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविले आहे. दरम्यान, यापैकी ज्योती नरवडे या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच असून, अमोल नरवडे हे उपसरपंच आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01689 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top