सरदार बिर्याणी.. एकदम टकाटक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरदार बिर्याणी.. एकदम टकाटक!
सरदार बिर्याणी.. एकदम टकाटक!

सरदार बिर्याणी.. एकदम टकाटक!

sakal_logo
By

सरदार बिर्याणी.. एकदम टकाटक!

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील ‘सरदार बिर्याणी’ परिसरात दर्जा आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ‘बिर्याणी खायची ना, मग चला तळेगाव ढमढेरे येथील सरदार बिर्याणी हाऊस’मध्ये,’ असे समीकरण निर्माण झाले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शरद लक्ष्मण ढमढेरे (सरदार) व चेतन लक्ष्मण ढमढेरे (सरदार) या बंधूंनी सरदारांची व हुतात्म्यांची आणि अर्धी काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भूमीत बेल्हे-जेजुरी या महामार्गावर स्वमालकीच्या एक एकर जागेत ‘सरदार बिर्याणी हाऊस’ या नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. त्यांचे वडील माजी सैनिक होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि आईचे प्रोत्साहन, नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ व ग्राहकांच्या अतूट प्रेमामुळे ढमढेरे बंधूंनी जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व कष्टाळू वृत्ती डोळ्यासमोर ठेवून सरदार बिर्याणीची वाटचाल सुरू ठेवली आहे.
ढमढेरे बंधूंनी सुरुवातीला सन २०१७ मध्ये गावात स्वतःच्या घरातच बिर्याणीचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी पार्सल सेवेतून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. याच काळात सरदार बिर्याणी परिसरातील नागरिकांच्या मनात ठसली. त्यानंतर सन २०२० मध्ये ‘सरदार बिर्याणी हाऊस’ या नावाने सर्व सुविधांयुक्त, सुसज्ज व आकर्षक इमारत असलेले हॉटेल सुरू केले. खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार ॲड. अशोकबापू पवार यांच्या हस्ते आणि असंख्य ग्राहक, मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नवीन हॉटेलचा शुभारंभ करण्यात आला. प्रशस्त इमारत, हॉटेलसमोर आकर्षक गार्डन, प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आणि स्त्री-पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र शौचालय आणि फॅमिली हॉलची व्यवस्था आहे.
या हॉटेलमध्ये घरगुती प्रकारची साजूक तुपातील दम बिर्याणी आणि सर्व प्रकारच्या साजूक तुपातील विविध व्हेज व नॉनव्हेज भाज्या ग्राहकांना दिल्या जातात. येथील आचारी अनुभवी असून, त्यांना दुबई, पुणे व मुंबई येथील थ्री स्टार हॉटेलचा अनुभव आहे. त्यामुळे ग्राहकांची आवड, पसंती व ऑर्डरनुसार हॉटेलमधील सर्व पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ ग्राहकांच्या व खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत. ‘ग्राहक सेवा, हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवून सरदार बिर्याणीची घोडदौड चालू आहे. स्वच्छता, टापटीपपणा, वेळेत सेवा, पौष्टिक जेवण यांचा योग्य समन्वय साधल्याने या व्यवसायाने गरुड भरारी घेतली आहे.
येथे एकदा बिर्याणी खाल्लेला ग्राहक पुन्हा आवर्जून येथे येतोच. दर्जा आणि गुणवत्ता यासाठी सरदार बिर्याणी परिसरात प्रसिद्ध आहे. ‘बिर्याणी खायची ना.. मग चला तळेगाव ढमढेरे येथील सरदार बिर्याणी हाऊस’मध्ये, असे समीकरण निर्माण झाले आहे. अवघ्या पाच वर्षात सरदार बिर्याणी नावारूपाला आली असून, आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. आगामी काळात पुणे परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी सरदार बिर्याणी हाऊसच्या शाखा सुरू करण्याचा मानस आहे. बिर्याणीसाठी राज्य व जिल्ह्यातील विविध भागातून ग्राहक येऊन कौतुक करतात. त्यामुळे आमच्यात ऊर्जा निर्माण होते. ग्राहकांच्या कौतुकामुळे आमचा उत्साह वाढतो, असे शरद ढमढेरे सांगतात. अलीकडील काळात ग्राहक म्हणतात, ‘वा..वा.. काय हॉटेल... काय सरदार बिर्याणी.. काय चविष्ट... सगळं काही टकाटक...!’

ढमढेरे बंधूंनी शेती व नोकरीला पूरक म्हणून हॉटेल व्यवसायाची निवड केली होती. त्यांच्या हॉटेल व्यवसायात आई-सुलोचना तसेच सौ. सुमित्रा शरद ढमढेरे व सौ. ज्योती चेतन ढमढेरे, मावसभाऊ युवराज शिंदे यांचे मोठे योगदान आहे. आजोबांच्या इच्छेनुसार मुलांची शैक्षणिक वाटचाल सुरू आहे. तसेच, कोरोना काळात कोविड सेंटरमधील रुग्णांना बिर्याणीचा आस्वाद दिला. लॉकडाउनमध्ये पुणे-नगर रस्त्याने पायी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना बिर्याणीचे वाटप केले.

शरद ढमढेरे
सरदार बिर्याणी हाऊस

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01694 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..