
तळेगाव येथे तीन हजार बकऱ्यांची खरेदी विक्री
तळेगाव ढमढेरे, ता. २५ : येथील (ता. शिरूर) शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात आज (ता. २५) झालेल्या शेळी- मेंढी बाजारात तीन हजार बकऱ्यांची खरेदी- विक्री झाली.
बाजारात एका शेळीला ७ ते ११ हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला तर एका मेंढीला ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. आजच्या बाजारात शेळी -मेंढी बरोबरच कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री झाल्याचे सभापती वसंतराव कोरेकर, उपसभापती प्रा. सतीश कोळपे, सचिव अनिल ढोकले व सहायक सचिव अनिल ढमढेरे यांनी सांगितले.
दरम्यान, येथील महात्मा फुले उपबाजारात पुणे, नगर, दौंड, मावळ, पुरंदर आदी ठिकाणचे व्यापारी आले होते. आषाढ महिन्यातील शेवटचा शेळी -मेंढींचा बाजार असल्याने खरेदी-विक्री करणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
शिरूर, हवेली, दौंड, श्रीगोंदा आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील बाजारात शेळ्या व मेंढ्या विक्रीसाठी आणल्या होत्या.
03521
Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01697 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..