अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार
अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. २१ : पुणे -नगर महामार्गावर शिक्रापूर येथून कोंढापुरीकडे जाताना पाठीमागून दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अनिकेत राम कसबे (वय १५ वर्षे) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे.
यासंदर्भात बाळासाहेब हनुमंत उपाडे (रा. चाकण, खंडोबा माळी, ता. खेड) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास शिक्रापूर येथून कोंढापुरीकडे अनिकेत राम कसबे हा दुचाकीवरून जात असताना कोंढापुरी हद्दीत पुणे -नगर महामार्गावर पुण्याहून नगरकडे वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात अनिकेत कसबे याच्या डोक्याला व पायाला जबर मार लागून जखमी झाल्याने अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. धडक दिलेल्या अज्ञात वाहनावरील चालक वाहनासह पळून गेला असून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01748 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..