शिवाजी महाराजांनी राष्ट्रीयत्वाची भावना रुजवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी महाराजांनी राष्ट्रीयत्वाची भावना रुजवली
शिवाजी महाराजांनी राष्ट्रीयत्वाची भावना रुजवली

शिवाजी महाराजांनी राष्ट्रीयत्वाची भावना रुजवली

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. ३१ : ‘‘स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ५० वर्षे सातत्याने कर्तव्य केले. महाराजांनी आपल्या कर्तव्याने लोकाभिमुख नियोजन केले. त्यांना व्यवस्थापनाचे विश्वगुरू म्हटले जात होते. सर्व धर्म समभाव ठेवून एकसंधता निर्माण केली आणि त्यातून राष्ट्रीयत्वाची भावना लोकांमध्ये रुजवली. आयुष्यभर त्यांनी जीवनमूल्य जपली. स्वराज्य जिंकायचे असेल तर शत्रूला सीमेवरच आडवा हे ध्येय त्यांचे होते. महाराजांनी सर्व लढाया बुद्धीने जिंकल्या, महाराज कधीही गाफील व बेसावध राहिले नाहीत. महाराजांनी त्या काळात जलसंधारणाची संकल्पना राबवून पाणी योजना लोकाभिमुख केली होती. लोकांचे कल्याण साधणे हेच त्यांचे प्रमुख ध्येय होते. युवा पिढीने महाराजांचा विचार व आचार डोळ्यासमोर ठेवावा.’’ असे मत शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे यांनी व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील व्याख्यानात बानगुडे बोलत होते. शिरूर हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते.
योगीराज उद्योग समूहाचे अध्यक्ष राहुल करपे, उद्योजक ज्ञानेश्वर थेऊरकर, ॲड. गणेश तोडकर यांनी व्याख्यानाचे आयोजन केले होते. या वेळी आमदार अशोक पवार, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवीबापू काळे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, खरेदी-विक्री संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र नरवडे, संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष ॲड. सुदीप गुंदेचा, उद्योजक मंदार पवार, जिल्हा दूध संघाचे संचालक ॲड. स्वप्नील ढमढेरे, रमेश भुजबळ, शिवाजी वडघुले, भीमा सोसायटीचे अध्यक्ष हनुमंत शिवले, माजी उपसरपंच नवनाथ ढमढेरे, विजय ढमढेरे, सोमनाथ भुजबळ, आरती भुजबळ, विद्या भुजबळ, प्रकाश करपे, बाळासाहेब लांडे, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, राकेश भुजबळ, शहाजी ढमढेरे, राहुल भुजबळ, सुनील ढमढेरे, बाळासाहेब ढमढेरे, राजेंद्र केदारी, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त आमदार अशोक पवार यांचा केक कापून व पुष्पहार घालून सत्कार केला.

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01765 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..