तळेगाव परिसरात मुसळधार पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव परिसरात मुसळधार पाऊस
तळेगाव परिसरात मुसळधार पाऊस

तळेगाव परिसरात मुसळधार पाऊस

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. ६: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) परिसरात आज सायंकाळी साडेपाच ते सातच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पावसाला अचानक सुरुवात झाली. यावेळी आकाशात विजांचा कडकडाट सुरू होता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. मुसळधार पावसामुळे विहिरी व विंधन विहीरीं च्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते धुवून निघाले. गणेशोत्सवात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नागरिक व शेतकरी वर्ग सुखावला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01782 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..