नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक हैराण
नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक हैराण

नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक हैराण

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता.१४ : शिक्रापूर (ता.शिरूर) येथे पुणे -नगर रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या रांगांमुळे स्थानिक, वाहनचालक तसेच प्रवासी हैराण झाले आहेत. सध्या या रस्त्याचे गावातून रुंदीकरण सुरू आहे. परंतु नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असल्याने तेथील पाबळ व चाकण चौक येथे मोठी कोंडी होत आहे.

वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्रापूर पोलिस रात्र-दिवस सतर्क असतात, परंतु येथील दोन्ही चौकामध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना स्थानिक नागरिकांसह प्रवाशांनाही करावा लागतो. कोंडीला स्थानिक प्रशासनही हतबल झाले आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सध्या दररोज पाऊस पडत असल्याने रस्त्याने चालणे कठीण झाले आहे.

दरम्यान, शिक्रापूर येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नगरहून पुण्याकडे जाणारी वाहने कासारी फाटा मार्गे तळेगाव ढमढेरे येथून एल. अँड टी फाट्यावरून पुण्याला जातात. कासारी फाट्यामार्गे पुण्याकडे वाहनांना जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली असली तरी शिक्रापूरची वाहतूक कोंडी मात्र नित्याचीच झाली आहे. सध्या शिक्रापूर गावातून वाहन चालकांना बाहेर पडणे डोकेदुखीचे ठरत आहे. शिक्रापूर येथील चाकण चौक व पाबळ चौकात दररोज नित्याचीच वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहन चालक, प्रवासी व स्थानिक नागरिक मात्र पुरते त्रस्त झाले आहेत.

03900