श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीत साकारली जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीत साकारली 
जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीत साकारली जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीत साकारली जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. २५ ः श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर ) येथे गवारी कुटुंबातर्फे जंजिरा किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती दिवाळीनिमित्त तयार करण्यात आली आहे. हा किल्ला पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली आहे.

किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या निर्मितीसाठी चैतन्य गवारी, मितांश गवारी, शौर्य गवारी, यश गवारी, हर्षवर्धन गवारी, शिवांश गवारी व सात्त्विक गवारी यांनी विशेष प्रयत्न केले, तसेच जान्हवी गवारी, अन्विता गवारी, काव्या गवारी व निरंजन दरेकर यांनी किल्ला बांधणीसाठी तसेच अंतर्गत सजावटीसाठी मदत केली. हा किल्ला बनवण्यासाठी १५ दिवस अहोरात्र प्रयत्न केले. किल्ला बनवण्यासाठी प्रा. संदीप गवारी व ॲड. संतोष गवारी यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

किल्ला पाहायला येणाऱ्या नागरिकांनी या बालगोपाळांचे विशेष कौतुक केले आहे. किल्ला पाहायला आलेल्या दुर्गप्रेमी व्यक्तींचा सन्मान करून त्यांना सीताफळाची रोपे गवारी कुटुंबातर्फे वाटप करण्यात आली.
-----------------