तळेगाव येथे मतदारांनी बजावला हक्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव येथे मतदारांनी बजावला हक्क
तळेगाव येथे मतदारांनी बजावला हक्क

तळेगाव येथे मतदारांनी बजावला हक्क

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता.६ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज (ता.६) चुरशीने मतदान झाले. येथील तीन केंद्रात ९५९ मतदारांपैकी ५९६ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
उमेदवारांसह मतदारांनी आज सकाळपासून तीन केंद्रांवर मतदान केले. येथील केंद्रावर तळेगाव ढमढेरे, धानोरे व कासारी या तीन गावातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिक्रापूर पोलिस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येथील मतदान प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पडली. कारखान्याच्या निवडणुकीत स्थानिक उमेदवार असल्याने मतदारांनी चुरशीने मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल आणि घोडगंगा किसान क्रांती पॅनेल यांच्यात चुरशीने मतदान झाले. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपापले मतदान घडवून आणण्यासाठी निकराचे प्रयत्न केले.
दरम्यान, येथील मतदान केंद्रांना आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार यांच्यासह दोन्ही पॅनेलच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी भेट देऊन मतदान प्रक्रियेची चौकशी केली.

03994