योगीराजबाबा महाराज पालखीचे प्रस्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगीराजबाबा महाराज पालखीचे प्रस्थान
योगीराजबाबा महाराज पालखीचे प्रस्थान

योगीराजबाबा महाराज पालखीचे प्रस्थान

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. १७ : श्रीक्षेत्र टाकळी भीमा (ता. शिरूर) येथून श्रीसंत सद्गुरु योगीराजबाबा महाराज पायीवारी पालखीचे श्रीराम मंदिराच्या प्रांगणातून आळंदीकडे वाजत गाजत, टाळ मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात प्रस्थान झाले. यावेळी अरुण महाराज पुंडे यांचे प्रवचन झाले. येथील ग्रामस्थांनी ठिकठिकाणी घरासमोर रांगोळी काढून पालखीचे पूजन केले व मनोभावे दर्शन घेतले.
पालखी सोहळा प्रमुख पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील वडघुले, पालखी चालक रामचंद्र शिवले, शिवाजीराव वडघुले, मोहन वडघुले, पोलिस पाटील प्रकाश करपे, पांडुरंग ढोरे, सरपंच कोमल माहुलकर उपसरपंच सविता घोलप, आकाश वडघुले, भजनकरी, विणेकरी, टाळकरी, वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महेंद्र वडघुले या शेतकऱ्याच्या बैलजोडीला पालखीच्या रथाचा मान मिळाला आहे. या पालखी सोहळ्यात टाकळी भीमा, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, सातकरवाडी, दहिवडी, निमगाव म्हाळुंगी, कासारी, तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, धानोरे, डिंग्रजवाडी, कोरेगाव भीमा, खंडाळे आदी शिरूर तालुक्यातील गावातून पायी वारीत वारकरी सहभागी झाले आहेत.