कासारी गावच्या पाणी योजनेसाठी तीन कोटीचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासारी गावच्या पाणी योजनेसाठी तीन कोटीचा निधी
कासारी गावच्या पाणी योजनेसाठी तीन कोटीचा निधी

कासारी गावच्या पाणी योजनेसाठी तीन कोटीचा निधी

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. ५ : कासारी (ता. शिरूर) येथील पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाच्या ‘जलजीवन मिशन’ योजनेअंतर्गत ३ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच सुनीता भुजबळ यांनी दिली.
कासारी गावची लोकसंख्या सुमारे ४ हजारच्या आसपास असून, गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा विभागाकडून निधी उपलब्ध झाला आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. या योजनेतून गावातील सर्व वाडी वस्त्यांवर घरोघरी नळ जोडणी करून त्याद्वारे पाणी मिळणार असल्याने महिला वर्गातही समाधान व्यक्त होत आहे.
गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवत असतो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी ग्रामसेवक वसंत पवार, माजी उपसरपंच सुखदेव भुजबळ, रोहिणी रासकर, संभाजी भुजबळ, किरण रासकर, गोपाळ भुजबळ, गणपतराव काळकुटे, स्नेहल भुजबळ, स्वाती नवले, सुनीता दगडे, पूनम नवले आदी सहकाऱ्यांच्या मदतीने गावात पाणीपुरवठ्यासह विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाल्याचेही भुजबळ म्हणाल्या.