बाळोबाचीवाडीत मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळोबाचीवाडीत मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना
बाळोबाचीवाडीत मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना

बाळोबाचीवाडीत मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. ७ : टाकळी भिमा (ता. शिरूर) बाळोबाचीवाडी येथे गवळीबाबा पुण्यतिथी आणि दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्यानिमित्त मूर्तींची सवाद्य मिरवणूक काढून मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. शनिवारी (ता. १०) सोहळ्याची सांगता होणार आहे.

यावेळी श्री गणेश, श्रीदत्त, विठ्ठल- रुक्मिणी व गरुड या चार मूर्तींची गावातून सवाद्य, वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ मृदंगाच्या गजरात बैलगाडीच्या पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त प्रवचन, कीर्तन व हरिजागर हे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यावेळी ग्रंथराज पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य व सोहळ्याचे प्रमुख सुनील वडघुले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे हे १९ वे वर्ष आहे.
मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना हभप पांडुरंग घुले यांच्या हस्ते झाले.
----------------------