संदीप सागंळे व सोमनाथ पाटील यांची पुणे विद्यापीठाच्या मंडळावर निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संदीप सागंळे व सोमनाथ पाटील यांची
पुणे विद्यापीठाच्या मंडळावर निवड
संदीप सागंळे व सोमनाथ पाटील यांची पुणे विद्यापीठाच्या मंडळावर निवड

संदीप सागंळे व सोमनाथ पाटील यांची पुणे विद्यापीठाच्या मंडळावर निवड

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. १२ : येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील मराठी विषयाचे विभाग प्रमुख प्रा. संदीप सांगळे व अर्थशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा. सोमनाथ पाटील यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड झाली आहे.

प्रा. संदीप सांगळे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवविज्ञान विद्याशाखेअंतर्गत "मराठी अभ्यास मंडळा"च्या निवडणुकीत तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. पुणे विद्यापीठ परिक्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील मराठी विषयाच्या विभाग प्रमुखांनी मतदानात सहभाग घेतला.

तसेच प्रा. सोमनाथ पाटील हे पुणे विद्यापीठाच्या "अर्थशास्त्र अभ्यास मंडळा"च्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवून प्रथम फेरीमध्ये विजयी झाले आहेत. पुणे विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुखांनी मतदानात सहभाग घेतला.

तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील प्रा. संदीप सांगळे आणि प्रा. सोमनाथ पाटील हे दोघेही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दोन विषयाच्या अभ्यास मंडळावर विजयी झाले. त्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंद ढमढेरे, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे व महेशबापू ढमढेरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक नवले यांनी दोघांचेही विशेष अभिनंदन केले.