तळेगाव ढमढेरे येथील रोडरोमिओंवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव ढमढेरे येथील
रोडरोमिओंवर कारवाई
तळेगाव ढमढेरे येथील रोडरोमिओंवर कारवाई

तळेगाव ढमढेरे येथील रोडरोमिओंवर कारवाई

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. २० : येथे शाळा व महाविद्यालयाभोवती विनाकारण इकडे-तिकडे दुचाकीवर फिरणाऱ्या रोडरोमिओंवर विशेष लक्ष ठेवून तळेगाव ढमढेरे दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे, पोलिस हवालदार किशोर तेलंग, अमोल नलगे, शंकर साळुंखे व ग्रामस्थांनी रोडरोमिओंवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्या पालकांसमवेत समज दिली.
शालेय अल्पवयीन विद्यार्थ्यांना संबंधित पालकांनी दुचाकी देऊ नये, असे पालकांना यावेळी पोलिसांनी सांगितले. येथील १०-१२ रोडरोमिओंनी शाळांभोवती दररोज हैदोस घातला होता. अनेक पालकांनी त्यांच्याविषयी तोंडी तक्रारी केल्या होत्या. त्याची पोलिसांनी दखल घेऊन गैरवर्तन करणाऱ्या रोड रोमिओंवर पोलिसांनी कारवाई केली.