Wed, May 31, 2023

आरोग्यविषयक उपक्रम
अतिशय स्तुत्य : पलांडे
आरोग्यविषयक उपक्रम अतिशय स्तुत्य : पलांडे
Published on : 11 February 2023, 10:29 am
तळेगाव ढमढेरे, ता. ११ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सकाळ माध्यम समूहातर्फे शनिवारी (ता. ११) सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम राबविण्यात आला. प्राचार्य संजीव मांढरे यांनी या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या वेळी पर्यवेक्षक बाळासाहेब कुलट, क्रीडा शिक्षक रमेश करपे, रमेश जाधव, मुकुंद ढोकले, महेश शेलार, प्रा. संजय देशमुख, प्रकाश धोत्रे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. तर, ‘‘सकाळ माध्यम समूहातर्फे राबविण्यात आलेला हा आरोग्यविषयक उपक्रम अतिशय स्तुत्य असून, विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व आपल्या कुटुंबातील पालकांनाही सांगावे व सर्वांनी दररोज सूर्यनमस्कार करावेत, असे मत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी व्यक्त केले.