तळेगाव ढमढेरे येथे विविध उपक्रम

तळेगाव ढमढेरे येथे विविध उपक्रम

तळेगाव ढमढेरे, ता. १२ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान व ग्रामस्थांतर्फे शिवजयंतीचे आयोजन केले होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी उत्कृष्ट रांगोळीचे रेखाटन करण्यात आले होते.
शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये १२७ युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. सर्व रक्तदात्यास वृक्षांचे वाटप करण्यात आले. रात्री युवक कीर्तनकार हभप मयूर कोंडे यांचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कीर्तन झाले. या वेळी विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com