निमगाव येथे उद्यापासून म्हसोबा देवाचा उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निमगाव येथे उद्यापासून
म्हसोबा देवाचा उत्सव
निमगाव येथे उद्यापासून म्हसोबा देवाचा उत्सव

निमगाव येथे उद्यापासून म्हसोबा देवाचा उत्सव

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. १२ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील ग्रामदैवत श्री म्हसोबा देवाचा उत्सव मंगळवारपासून (ता. १४) सुरू होत असून, दोन दिवसांच्या या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मंगळवारी श्रींची महापूजा व अभिषेक आणि श्रींच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. याच दिवशी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. रात्री भजनाचा कार्यक्रम होणार असून, निलेशकुमार अहिरेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आहे. बुधवारी निकाली कुस्त्यांचा आखाडा होणार असून, यामध्ये पहिलवान हनुमंत शिंदे व पहिलवान अनिल ब्राह्मणे यांची निकाली कुस्ती होणार आहे.
रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.