‘दुय्यम निबंधक’चे तळेगावात काम ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘दुय्यम निबंधक’चे
तळेगावात काम ठप्प
‘दुय्यम निबंधक’चे तळेगावात काम ठप्प

‘दुय्यम निबंधक’चे तळेगावात काम ठप्प

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. १६ : येथील दुय्यम निबंधक कार्यालय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद असल्यामुळे येथील कामकाज पूर्ण ठप्प झाले असल्याचे ॲड. सुरेश भुजबळ व ग्रामस्थांनी सांगितले.
राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संप असल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय पुढील आदेश येईपर्यंत बंद राहील, याची सर्व पक्षकार, दस्त लेखनिक व वकील यांनी नोंद घ्यावी, अशी सूचना दुय्यम निबंध कार्यालयाच्या बंद दरवाजावर लावली आहे.