भुजबळ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजाराम शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुजबळ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजाराम शिंदे
भुजबळ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजाराम शिंदे

भुजबळ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजाराम शिंदे

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. २६ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील संभाजी भुजबळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजाराम कोंडिबा शिंदे आणि उपाध्यक्षपदी दादाभाऊ रघुनाथ भुजबळ यांची बिनविरोध निवड झाली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून, संचालकांच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. कुंभार यांनी कामकाज पाहिले.
यावेळी राजेंद्र ज्ञानोबा गोरे, रमेश लक्ष्मण भुजबळ, सुरेश गेणू रासकर, अशोक भैरू भुजबळ, अरुण विठोबा भुजबळ, मंदा संजय ढमढेरे, सुनंदा तानाजी सातपुते, रंजना अर्जुन नरके, प्रमोद शंकर ढवळे हे नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते.
निवडीनंतर अध्यक्ष राजाराम शिंदे व उपाध्यक्ष दादाभाऊ भुजबळ यांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. संचालक मंडळाला विश्वासात घेऊन सर्व सभासदांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे निवडीनंतर अध्यक्ष शिंदे व उपाध्यक्ष भुजबळ यांनी सांगितले.
पतसंस्थेची सभासद संख्या २ हजार ७५१ इतकी असून, संस्थेतर्फे गरजूंना विविध कारणांसाठी कर्ज पुरवठा केला आहे. यावेळी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुजबळ, कॅशिअर नितीन भुजबळ, वरिष्ठ लेखनिक वैभव दीक्षित, लेखनिक स्वाती ढवळे, कोमल भुजबळ, भाग्यश्री शिंदे व सेवक वैभव बनसोडे आदी उपस्थित होते.