महाराष्ट्र हे इतिहास निर्माण करणारे समृद्ध राज्य

महाराष्ट्र हे इतिहास निर्माण करणारे समृद्ध राज्य

तळेगाव ढमढेरे, ता.२८ : ''''मराठेशाहीने देशाच्या इतिहासाचा प्रवाह व दिशा बदलली, महाराष्ट्र हे इतिहास निर्माण करणारे समृद्ध राज्य असून, पराक्रमी व क्रांतिकारी चळवळीच्या राज्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे,'''' असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहेबराव शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेत "भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान" या विषयावरील व्याख्यानात डॉ. मोरे बोलत होते.
शिक्षण संस्थेचे संचालक महेश ढमढेरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी शकुंतला फाउंडेशनच्या अध्यक्षा शोभा ढमढेरे, प्राचार्य अशोक नवले, व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा. पद्माकर गोरे, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

महाराष्ट्रावर सातत्याने परकीय आक्रमणे झाली. येथील संस्कृती व परंपरा बिघडविण्याचे अनेक प्रयत्न महाराष्ट्राच्या भूमीत झाले. परंतु अशाही परिस्थितीत महाराष्ट्र सावरला. येथे इतिहासाला वळण देणारे आणि इतिहास घडविणारे लोक आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे प्रबोधनाचा आणि शौर्याचा वारसा पुढे नेणारे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला स्वाभिमान, पराक्रम व शौर्य दिले. त्यामुळेच मराठेशाहीचा दबदबा संपूर्ण हिंदुस्थानात आहे. तसेच हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री धावला ही उपाधी आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे डॉ.सदानंद मोरे यांनी सांगितले. यावेळी संचालक महेश ढमढेरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रा.पराग चौधरी यांनी प्रास्ताविक केले. प्रा.दत्तात्रेय कारंडे यांनी सूत्रसंचालन केले.

04494

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com