टाकळी भीमा येथील मंदिरात 
उत्सव मूर्तींना अभिषेक, महापूजा

टाकळी भीमा येथील मंदिरात उत्सव मूर्तींना अभिषेक, महापूजा

तळेगाव ढमढेरे, ता. ३० : श्रीक्षेत्र टाकळी भीमा (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथील मंदिरातील मूर्तींना विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. उत्सव मूर्तींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. येथील उत्सवाला परिसरातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती. येथील श्रीराम जन्मोत्सव शिरूर तालुक्यात प्रसिद्ध आहे. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आबासाहेब गोडसे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सामूहिक पाळण्याचे गायन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, घोडगंगा कारखान्याचे संचालक दादापाटील फराटे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, काँग्रेसचे जिल्हा खजिनदार महेश ढमढेरे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील वडघुले आदींनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, घोडगंगा कारखान्याचे संचालक सोपान गवारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे, राहुल गवारे, युवा नेते राहुल करपे, पोलिस पाटील प्रकाश करपे, घोडगंगाचे माजी संचालक शिवाजी वडघुले, बाळासाहेब ढमढेरे, रामचंद्र शिवले, राजेंद्र जाधव, संपत वडघुले, रामदास दोरगे, मोहन वडघुले, अप्पा ढोरे, उमेश काळे, सरपंच कोमल माहुलकर, विविध संस्थांचे पदाधिकारी, उत्सव कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कालखंडात प्रवचन, कीर्तन, हरीजागर व हरिपाठ आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील वडघुले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com