बिबट्यांच्या वावरामुळे तळेगावमध्ये दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्यांच्या वावरामुळे तळेगावमध्ये दहशत
बिबट्यांच्या वावरामुळे तळेगावमध्ये दहशत

बिबट्यांच्या वावरामुळे तळेगावमध्ये दहशत

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. ३०: तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचे वास्तव्य वाढले आहे. यामुळे शेतात काम करणारा शेतकरी व शेतमजूरवर्गात भीतीदायक वातावरणात निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, धानोरे, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, कासारी, कोंढापुरी आदी परिसरात बिबट्यांचा वावर आहे. दररोज कोठे ना कोठे तरी शेतकऱ्यांना किंवा शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन होत आहे. परिसरात आतापर्यंत बिबट्याने हल्ला करून पाळीव प्राणी फस्त केले आहेत. मेंढपाळांच्या कळपात घुसून बिबट्याने हल्ला करून शेळ्या- मेंढ्या फस्त केल्या आहेत. या सर्वांचा आर्थिक फटका शेतकरी, शेतमजूर व मेंढपाळ यांना झालेला आहे.

तळेगाव ढमढेरे परिसरात बिबट्याच्या वास्तव्यामुळे शेतकरी वर्ग व कामगार वर्ग पूर्णतः दहशतीखाली असून, भीतीदायक वातावरणामुळे शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यासाठी धजावत नाहीत. वनविभागाने परिसराची त्वरित पाहणी करून जिथे बिबट्याचे जास्त वास्तव्य आहे अशा ठिकाणी पिंजरा लावावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा येथील शेतकरी श्रीकांत सातपुते यांनी व्यक्त केली आहे.