तळेगावात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

तळेगावात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

तळेगाव ढमढेरे, ता.२४ : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील मुख्य चौकात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई करून दंड ठोठावला आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशानुसार तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी नाकाबंदी केली. याद्वारे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
तळेगाव ढमढेरे येथील मुख्य चौकात नुकतीच नाकाबंदी करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक वैभव स्वामी व सहकारी पोलिसांनी येथील चौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. यामध्ये वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, मोटरसायकलवरून तिघांनी प्रवास करणे, नंबर प्लेट नसणे, काळी काच, सीट बेल्ट नसणे आदी वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई करून दंड ठोठावला आहे. अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करीत असून, पोलिसांनी ठिकठिकाणी रस्त्यावर अधून-मधून वाहन चालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. तळेगाव ढमढेरे येथील रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी नजर ठेवून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केल्यास बेशिस्त वाहन चालकांना जरब बसेल. तसेच वाहन चालकांना रस्त्यावरील नियमांविषयी पोलिसांनी समुपदेशन किंवा मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे येथील काही नागरिक अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

04694

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com