तळेगाव ढमढेरे येथील पाच जणांची पोलिस दलात निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव ढमढेरे येथील पाच जणांची पोलिस दलात निवड
तळेगाव ढमढेरे येथील पाच जणांची पोलिस दलात निवड

तळेगाव ढमढेरे येथील पाच जणांची पोलिस दलात निवड

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. २५ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर ) येथील तीन मुले व दोन मुलींची पोलिस दलात निवड झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामध्ये अक्षय टिळेकर (मुंबई शहर पोलिस), भूषण महाजन (पुणे शहर पोलिस) व सचिन डेंगळे (मुंबई रेल्वे पोलिस) तसेच आकांक्षा भुजबळ (पुणे शहर पोलिस) व वैष्णवी अवचिते (मुंबई शहर पोलिस). तळेगाव ढमढेरे येथील या पाच जणांची पोलिस पदावर निवड झाली आहे.
पोलिस पदावर निवड झालेल्या पाचही जणांनी अतिशय जिद्द व हिमतीने अभ्यास करून परीक्षा दिली. परीक्षेसह इतर सर्व क्षमतांमध्ये उत्तीर्ण होऊन त्यांची पोलिस पदावर निवड झाली आहे.
आई- वडिलांनी कष्ट केल्याने आम्हाला शिक्षणाची संधी मिळाली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगून पोलिस होण्याची जिद्द अंगी बाळगली आणि आम्ही यशस्वी झालो, अशी प्रतिक्रिया निवड झालेल्या पाचही पोलिसांनी दिली.
यशस्वी झालेल्या सर्व पोलिसांचे आमदार अशोक पवार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.