Wed, Sept 27, 2023

कोंढापुरीत वाहनाच्या
धडकेत कामगाराचा मृत्यू
कोंढापुरीत वाहनाच्या धडकेत कामगाराचा मृत्यू
Published on : 28 May 2023, 2:37 am
तळेगाव ढमढेरे, ता. २८ : कोंढापुरी (ता. शिरूर) येथे पुणे -नगर रस्त्यावरून कंपनीत पायी जाणाऱ्या कामगाराला पाठीमागून वेगात येणाऱ्या वाहनाने जोरात धडक दिल्याने कामगाराचा मृत्यू झाला आहे.
यात मेहरबान विठ्ठल गायकवाड (वय ५८) यांचा मृत्यू झाला. याबाबत अजय मेहरबान गायकवाड (रा. कोंढापुरी) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातग्रस्त वाहन जागेवर सोडून वाहन चालक पळून गेला आहे. वाहन चालकाविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.