कोंढापुरीच्या स्वप्नील गायकवाड यांची अध्यक्षपदी निवड
तळेगाव ढमढेरे, ता. ११ : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील स्वप्नील अरुणराव गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी गायकवाड यांना निवडीचे पत्र दिले.
यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे, आमदार ॲड.अशोक पवार, शिरूर बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र नरवडे, उद्योजक विनय गायकवाड, माजी उपसरपंच विजय ढमढेरे, संचालक संजय काळे, श्याम काळे, सुरेश कोल्हे, योगेश गायकवाड, अनिल देशमुख आदी उपस्थित होते. निवडीनंतर जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.