
सारीकाताई यांची पाटीलकी दिशादर्शक
सारीकाताई यांची पाटीलकी दिशादर्शक
सौ. सारीकाताई तुषार पाचुंदकर, (बी.ई. कंम्प्युटर)
रांजणगाव गणपती (ता. शिरूर)
माहेरचा वडिलांचा समाजसेवेचा वारसा आणि सासरी पोलिस पाटील म्हणून मिळालेल्या गावच्या नेतृत्वामुळे रांजणगाव गणपती येथील पोलिस पाटील सारीकाताई तुषार पाचुंदकर यांच्या जीवनाला सामाजिक कार्याची झालर लाभली आहे. गावाच्या विकास कामांत, कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी लोकसहभाग वाढविला. तो गावासाठी दिशादर्शक ठरू लागला आहे. कोरोना काळात त्यांनी कामगार स्थलांतराचा, लसीकरणाचा, अन्न व पाण्याचा प्रश्न सोडवला. गावाच्या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत केली.
माहेरचा वडिलांचा समाजसेवेचा वारसा व वसा आणि सासरी पोलिस पाटील म्हणून मिळालेलं गावचं नेतृत्व, यामुळे शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील पोलिस पाटील सारिकाताई तुषार पाचुंदकर यांच्या जीवनाला सामाजिक कार्याची झालर लाभली आहे. गावच्या विकास कामांत, कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी लोकसहभाग वाढविला आहे. तो गावासाठी दिशादर्शक ठरू लागला आहे.
श्री अष्टविनायक महागणपती मंदिर व आशिया खंडातील एकमेव पंचतारांकित औद्योगीक वसाहतीमुळे शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती गावाचा नावलौकीक आहे. त्यामुळे परिसरातील वाढती लोकसंख्या व परराज्यातून येणाऱ्या कामगारांमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या वाढल्या आहेत. वाढत्या गर्दीमुळे गावातील गुन्ह्यांची समस्यादेखील अधिक जाणवू लागल्या आहेत. वाढत्या गुन्ह्यांची संख्या पाहता गावात महिला पोलिस पाटील म्हणून त्यांची जबाबदारी मोठी आहे.
चुलते फक्कडमामा शिंदे (टकाटक मामा) व वडील भाऊसाहेब शिंदे यांनी उपसभापती व जिल्हा परिषद सदस्य म्हणून समाजाची सेवा केली. त्याच वारसाने समाजसेवेचे व्रत त्यांनी जोपासले आहे. कोरोना
काळात वैद्यकीय अधिकारीदेखील पीपीए कीट घातल्याशिवाय रुग्णांची तपासणी करत नव्हते. अशा काळात सारीकाताई यांनी कामगार स्थलांतराचा, लसीकरणाचा, अन्न व पाण्याचा प्रश्न सोडवला. प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख यांच्या सोबतीला उभे राहून कामगारांच्या जेवणासाठी व त्यांच्या स्थलांतरासाठी प्रशासनाबरोबर काम केले. एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत त्यांनी गावच्या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत केली आहे. त्यामुळेच आता कोरोना कमी झाल्यानंतर परराज्यातून आलेले कामगार मोठ्या विश्वासाने पुन्हा औद्योगिक वसाहतीकडे येऊ लागले आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन पुणे ग्रामीण पोलिस विभागाने त्यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविले आहे. औद्योगीक वसाहतीमध्ये घडणारे गुन्हे व गावात येणाऱ्या नवीन कामगार गुन्ह्याबाबत त्यांचे अधिक लक्ष असते. पोलिस खात्याशी व महसूल खात्याशी अधिकाअधिक संपर्क ठेवून गावात शांतता ठेवण्याचे काम करतात. धाडसी बाण्यामुळे त्यांच्या हातून होणारी समाजसेवा नेहमीच चर्चेत असते.
यापुढील काळात स्त्रीभ्रुणहत्या, लैंगिक अत्याचार व अल्पवयीन लग्न, कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम ते करणारच आहेत. धार्मिक उत्सव, राजकीय निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी त्यांची मोलाचे योगदान असते.गुन्ह्याची तत्काळ संबंधित विभागाला माहिती देऊन मदत मिळवून देत अत्याचार घडणार नाहीत याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01647 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..