वूमन एक्सलन्स अवार्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वूमन एक्सलन्स अवार्ड
वूमन एक्सलन्स अवार्ड

वूमन एक्सलन्स अवार्ड

sakal_logo
By

खेड विभाग
...................
समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या स्वातीताई

विचारांचे बळ आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर शिक्षण घेत नेतृत्वसंपन्न गुण अवगत केला. शिक्षण घेऊन ही विद्यार्थिनी उच्चपदस्थ अधिकारी होणार, असे शिक्षकांचे भाकीत असतानाच त्या पदाधिकारी म्हणून नावारूपाला आल्या. तुळापूर (ता. हवेली) येथील माहेरकडून मिळालेले संस्काराचे धडे आणि रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील राजकीय वारसा असणाऱ्या पाचुंदकर पाटील कुटुंबाच्या पाठबळामुळे स्वातीताई दत्तात्रेय पाचुंदकर पाटील यांनी सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य होऊन राजकीय पटलावर विशेष नावलौकीक मिळवला आहे. सर्व समाजाच्या सुखदुःखात सहभागी होऊन बहरलेले नेतृत्व व त्यातच विकासकामांचा उभा केलेला महामेरू यामुळे सर्वसामान्यांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजविले आहे.
तुळापूर (ता. हवेली) येथील प्रगतिशील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील माजी उपसरपंच कै. भगवंत धनुजी शिवले यांच्या कडून त्यांना राजकीय बाळकडू मिळाले आहे. बी. कॅामपर्यंतचे शिक्षण करत एन. एन. एस. तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून त्यांनी मुलींचे नेतृत्व केले. याच काळात त्या पाचुंदकर पाटील या कुटुंबाच्या
सूनबाई झाल्या. जवळपास ६ वर्षे त्यांनी गृहिणी म्हणून काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळून दिले. त्यामुळेच माहेरचे संस्कार व पाचुंदकर कुटुंबाच्या राजकीय पाठबळाने व दीर माजी जिल्हा परिषद सदस्य शेखरदादा पाचुंदकर पाटील यांच्या मार्गदर्शनाने राजकारणात येण्याची संधी त्यांना मिळाली. २०१३ मध्ये रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीमध्ये निवडून येऊन महिला सरपंच म्हणून नेतृत्वाची संधी मिळाली. पती दत्ताशेठ पाचुंदकर पाटील यांची मोलाची साथ मिळाल्याने त्यांचा राजकीय प्रवास बहरत गेला.
औद्योगिक वसाहत व अष्टविनायक श्री महागणपती यामुळे राज्यात रांजणगाव गणपती गावचा नावलौकीक मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची जबाबदारी मोठी होती. या काळात त्यांनी सुसज्ज बाजारतळ, अंतर्गत रस्ते, गटार लाईन, साठवण बंधारे, वाडीवस्ती वरील पाणीपुरवठा व शासनाच्या विविध योजना गावपातळीवर राबविल्या. सकाळ तनिष्का गटातून संघटन उभे करत महिला सबलीकरणासाठी त्यांचे नेतृत्व मोलाचे ठरले. महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण दिले. त्यांनी केलेल्या विकास कामांमुळेच जिल्हा परिषदेने त्यांना २०१४ - २०१५ मध्ये आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार दिला. समाजहिताची कामे आणि सर्व सामान्य माणसांच्या सुखदुखासाठी जागरूक नेतृत्व म्हणून घराघरांत पोहचल्या. त्यामुळेच २०१७ मध्ये पुन्हा महिला आरक्षण आल्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारेगाव- रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक लढवून जिंकली. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण यांना मुलतत्वावर ठेवून समाजहितासाठी नेतृत्वगुण पणाला लावले. गावागावात वेगवेगळ्या विकासाच्या कामांना त्यांचा मोलाचा हातभार लागला आहे. ग्रामपंचायत कार्यालय, वर्गखोल्या, शौचालय युनिट असो की स्मशानभूमीतील भौतिक सुविधा यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला पहावयास मिळतो. नेतृत्व गुण असल्याने प्रभावी वकृत्वाने व्यासपीठ गाजवीत सर्वसामान्यांना विकासकामांत मदत करण्याचे काम ते नेहमी करतात. हळदीकुंकू, नवरात्र उत्सव, व धार्मिक कार्यक्रमात त्या महिलांसाठी विविध समाजपयोगी उपक्रम राबवितात. कोरोना काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाचुंदकर यांनी कोरोना रुग्णांना मोठी मदत मिळवून दिली.

गावातील तरुणाई व्यसनापासून दूर राहण्यासाठी गावागावात भजनी मंडळांना प्रोत्साहन देत साहित्याची वाटप करत संगीत भजनाची आवड निर्माण केली. गेली पाच वर्षे जिल्हा परिषद सदस्या म्हणून उत्कृष्ट काम केल्यामुळे यावर्षी त्यांना जिल्हा परिषदेने आदर्श जिल्हा परिषद सदस्या म्हणून सन्मान केला आहे. बहरलेल्या नेतृत्व संपन्न
राजकारणाला माहेर, सासर आणि सर्वसामान्य जनतेमुळेच शक्य झाल्याचे ते आवर्जून सांगतात.
------------------------------------------------------------------------------------------------
03123

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01659 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top