मिडगुलवाडीच्या सरपंचपदी वर्षा मिडगुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिडगुलवाडीच्या सरपंचपदी वर्षा मिडगुले
मिडगुलवाडीच्या सरपंचपदी वर्षा मिडगुले

मिडगुलवाडीच्या सरपंचपदी वर्षा मिडगुले

sakal_logo
By

टाकळी हाजी : मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी वर्षा धनंजय मिडगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रभाताई मिडगुले यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या ठिकाणी सरपंच पदासाठी निवडणूक लागली होती. सरपंच पदासाठी मिडगुले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध सरपंच म्हणून घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. बी. शेटे यांनी काम पाहिले. ग्रामसेवक ए. बी. वाघुले यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे, गणेश रत्नपारखी, उत्तम
माळवदे, पोपट मिडगुले, भक्तीराम गाजरे संग्राम शिवले, अनिल मिडगुले, दत्तात्रेय मिडगुले, श्रीरंग नरवडे यांनी त्यांचा अभिनंदन केले. गावचा दुष्काळी भाग त्यातून पाण्याची समस्या असल्याने भविष्यात पाण्याविषयी विकास कामे करू, असे नवनिर्वाचित सरपंच मिडगुले यांनी सांगितले.

03161

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01678 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top