खरीपाच्या हंगामाला महागाईची झळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरीपाच्या हंगामाला महागाईची झळ
खरीपाच्या हंगामाला महागाईची झळ

खरीपाच्या हंगामाला महागाईची झळ

sakal_logo
By

रांजणगाव गणपती, ता. ९ : शिरूर तालुका तसेच जिल्ह्यात महिन्यावर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामाच्या कामाला वेग आला आहे. असे असले तरी येणाऱ्या हंगामात बी बियाणे, खते व कीटकनाशके विकत घ्यावी लागणार आहे. त्यांच्या किमतीत कमालीची वाढ झाल्याने त्याचा खर्च ४० ते ६० टक्के वाढणार आहे, यामुळे बळिराजा चिंताग्रस्त बनला आहे.

कृषी विभागाने ५७ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये खरीपाच्या पेरणीचे नियोजन केले आहे. त्यात बाजरी पेरणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खरिपात पेरण्यात येणाऱ्या बी बियाणांमध्ये वाढ झाली आहे. पेरणीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. मशागतीला इंधनामुळे दर वाढल्याने शेती खर्चात वाढ होणार आहे. याचप्रमाणे मिश्रित खतांच्या किमतीत ही मोठी वाढ झाली आहे. त्या पाठोपाठ कीटकनाशकांच्या किमती ही वाढल्या आहेत. यामुळे शेतकरी पैशाच्या जुळवाजुळवीच्या व मशागतीच्या कामी लागला आहे.

डिझेल, पेट्रोल दरवाढीचा परिणाम शेती मशागतीवर झाल्याचे दिसून येत आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतीच्या मशागतीची कामे महागली आहे.

तणनाशक व औषधांच्या किमतीत दुपटीने वाढ
शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांपासून तणनाशक यांची फवारणी सुरू केली आहे. त्यामुळे पैसेच नाही तर वेळही वाचत असल्याने शेतकऱ्यांची तणनाशक औषधाला पसंती होती. पण आता तणनाशक औषधांचे भाव दुपटीने वाढ झाले आहे. यामुळे वाढलेल्या किमतीचा प्रभाव शेतकऱ्यांच्या नियोजित खर्चावर होणार आहे.

शेतीच्या नियोजनात बळिराजा व्यस्त
ऐन हंगामात साठेबाजी होत असल्याने शेतकऱ्यांना भरमसाट किमतीत बियाणे, खते, कीटकनाशके विकत घ्यावी लागतात. आवश्यक खते सुद्धा शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. त्यात बियाण्यांची भर पडते. त्यामुळे शेतकरी या खरीप हंगामासाठी आवश्‍यक बियाणे, कीटकनाशके, खते आदीच्या नियोजनात आतापासून व्यस्त दिसून येत आहे.

भविष्यात तरुण शेतकरी वर्गांनी जैविक शेतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे शेती करायला परवडेल. जैविक शेतीमुळे मानवी जीवनाला फायदे होतील. कीटकनाशक वापरात असल्याने अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे. जैविक पद्धतीचा वापर करावा जेणे करून भविष्यात ज्या रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. त्या आपोआप कमी होतील.
- शिवाजीराव चिखले, शेतीनिष्ठ शेतकरी, राज्य शासन पुरस्कार प्राप्त, पिंपरी दुमाला (ता. शिरूर)
03164

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01680 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top