कवठे येमाई, शिंदेवाडीत घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कवठे येमाई, शिंदेवाडीत घरफोडी
कवठे येमाई, शिंदेवाडीत घरफोडी

कवठे येमाई, शिंदेवाडीत घरफोडी

sakal_logo
By

टाकळी हाजी, ता. ३० : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाई व शिंदेवाडी येथे घरफोडीत सुमारे सव्वाचार लाख रुपये रोकड, १० तोळे सोने व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केले.
कवठे येमाई (ता. शिरूर) येथील ढाकीवस्तीवरील डॉ. योगेश मुखेकर व त्यांचे कुटुंब शनिशिंगणापूर येथे गेले होते. चोरट्यांनी रात्री घराचे कुलूप तोडून सव्वादोन लाख रुपये रोकड, देव्हाऱ्यातील देव, मोबाईल चार्जर, दोन कोरे चेक लंपास केले आहे. पहाटे देवदर्शन घेऊन परत आल्यावर कुलूप तोडून चोरी झाल्याचे लक्षात आले. येथील शिवाजी येधु मुखेकर, भरत मुरलीधर मुखेकर यांचीही बंद घरे चोरट्यांनी उघडून उचकापाचक केली. तेथे मात्र काही गेले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
तसेच, मलठण-शिंदेवाडी (ता. शिरूर) येथे दगडाबाई मल्हारी कोळपे या आजींच्या घराचा दरवाजाला कुलूप लावून घराच्या टेरेसवर सर्व कुटुंब झोपले होते. रात्रीच्या वेळी कोळपे यांच्या घराचे कुलूप कापून चोरट्यांनी घरात प्रवेश करत २ लाख रुपयांची रक्कम व अंदाजे १० तोळे सोने, असा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
दरम्यान, पोलिस कर्मचारी सुरेश नागलोत, धनंजय थेऊरकर हे घटनास्थळी पोचले होते. पोलिसांनी पाहणी व पंचनामा केला. वरिष्ठांशी चर्चा करून या ठिकाणी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना बोलाविण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01683 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top