कवठे येमाई येथे नमाज पठण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कवठे येमाई येथे नमाज पठण
कवठे येमाई येथे नमाज पठण

कवठे येमाई येथे नमाज पठण

sakal_logo
By

टाकळी हाजी, ता. ५ ः शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. गावागावात नमाज पठण करण्यात आले.
कवठे येमाई (ता. शिरूर) येथे ईदगाह मैदानावर नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते. मौलाना अब्दुल रज्जाक यांनी मार्गदर्शन केले. टाकळी हाजी, पिंपरखेड, जांबूत, सविंदणे, मलठण, रावडेवाडी येथे नमाज पठणाचा कार्यक्रम शांततेत पार पडला. मुस्लिम बांधवांना माजी आमदार पोपटराव गावडे, घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे, पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे, माजी सरपंच दामू घोडे यांनी शुभेच्छा दिल्या. शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले यांनी परिसरात बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01689 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top