प्रशांत चोरे अध्यक्षपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशांत चोरे अध्यक्षपदी
प्रशांत चोरे अध्यक्षपदी

प्रशांत चोरे अध्यक्षपदी

sakal_logo
By

टाकळी हाजी, ता. ९ ः टाकळी हाजी (ता. शिरूर) डोंगरगण येथील बापूसाहेब गावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रशांत बबन चोरे यांची तर उपाध्यक्षपदी दीपक हरिदास चोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची, माहिती निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. मोरे यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. सर्व संचालकांनी एकमताने अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे सांगितले. सोसायटीचे सचिव देवराम गुलदगड यांनी काम पाहिले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने सर्व संचालकांची गावात मिरवणूक काढण्यात आली होती. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व संचालकांनी व डोंगरगण ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01691 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top