बियाणे घरीच तयार करण्याकडे कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बियाणे घरीच तयार करण्याकडे कल
बियाणे घरीच तयार करण्याकडे कल

बियाणे घरीच तयार करण्याकडे कल

sakal_logo
By

टाकळी हाजी, ता. ११ : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. त्यासाठी लागणारे खात्रीशीर बियाणे घरीच तयार करण्याकडे शेतकऱ्यांमध्ये कल दिसून येतो. त्यामुळे परिसरात सध्या कांदा बियाणे तयार करण्याची लगबग सुरू आहे.
ढेंगळ्या कांदा लागवडीतून खात्रीशीर बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा ओढा असतो. अनेकवेळा विकत घेतलेले बियाणे खराब अथवा रोपे निकृष्ट दर्जाची तयार होतात. त्यातून शेतकऱ्यांना दुबार लागवडीला सामोरे जावे लागते. गेल्या काही वर्षात अवकाळी पाऊस व खराब रोपांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे कांदा उत्पादनात घट शेतकऱ्यांना सोसावी लागली. ती भरून काढण्यासाठी सध्या घरीच बियाणे तयार करण्यात येत आहेत.

बियाणे तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत. मशिनद्वारे व घरगुती पद्धतीने कांदा बियाणे तयार केली जातात. खात्रीशीर आणि उगवण क्षमता चांगली व्हावी, यासाठी अनेक शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने म्हणजेच खळ्यात गोंडे तापवून मजूर महिलांकडून लाकडी दांडीच्या साहाय्याने गोंडे कुटून बियाणे तयार करतात.

गेल्या वर्षी अडीच हजार रुपये प्रतिकिलो बाजारभावाने कांद्याचे बियाणे विकले गेले. साधारण सप्टेंबरच्या काळात हे बियाणे शेतात टाकले जाते. त्यानंतर दीड महिन्यानंतर कांदा रोपे लागवडी योग्य तयार होत असतात. कांदा लागवडीसाठी घरगुती पद्धतीने बियाणे तयार केल्यास ते खात्रीशीर बियाणे तयार होतात. पारंपरिक पद्धतीने तयार केलेले बियाणांची उगवण क्षमता चांगली असते. त्यातून मिळणारे उत्पादन खात्रीशीर मिळते.
- इंद्रजित खामकर, शेतकरी टाकळी हाजी, ता. शिरूर
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
उत्कृष्ट कांदा रोपे तयार करावयाची असतील तर बियाणे खात्रीशीर मिळाले पाहिजे. त्याबरोबर कांदा बियाणे घरीच तयार केल्यावर कांदा बियाणांना वाढणाऱ्या भावाला आळा बसतो. जास्तीत जास्त कांदा उत्पादन घेणारे शेतकरी पारंपरिक घरगुती पद्धतीने बियाणे तयार करून कांद्याची रोपे तयार करतात.
-पांडुरंग जगताप, माजी सोसायटी अध्यक्ष जांबूत, ता. शिरूर
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
03196

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01695 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top