
हापूस सामान्यांच्या आवाक्यात
रांजणगाव गणपती ता. १२ : शिरूर तालुक्यातील विविध आठवडे बाजारांमध्ये आंब्याचा हंगाम जोरात सुरू आहे. एक हजार रुपये डझनाचा हापूस आता सुमारे दीडशे रुपये किलोस मिळत आहे. वातावरणात वाढलेला उष्मा व आवक वाढल्याने हा दर स्थानिक बाजारपेठेत उतरल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात हापूस आंबा आला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या आंब्यांची विक्रीसाठी बाजारपेठेत चढाओढ दिसून येत आहे.
कोकणातील हापूस आंबा बागायतदारांना नैसर्गिक संकटांना सामना करावा लागला होता. यातून वाचलेल्या फळाला सुरुवातीला मोठा दर मिळाला. पण आता वातावरणात बदल झाल्याने तसेच उष्णता वाढल्याने झाडावरच फळ लवकर तयार होऊ लागले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काढणी झाल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक वाढली आहे. गेल्या आठवड्यात सहाशे ते सातशे रुपये डझन असणारा आंबा सध्या बाजारपेठेत शंभर ते दीडशे रुपये किलो मिळू लागला आहे. कर्नाटक हापूस आंब्याची आवक झाल्याने तो देखील ५० रुपये प्रतिकिलो दरात मिळू लागला आहे. तोतापुरी, लालबाग, केशर, बदाम हे देखील आंबे दाखल झाल्याने बाजारात विक्रेत्यांची चढाओढ लागली आहे. त्यातून हापूसचा दर खालावला आहे.
थेट बागायतदारांकडून आंब्याची आवक झाली आहे. एकदम जास्त प्रमाणात आंबा उचलल्याने आम्हालाही दरात सूट मिळते. दिवसभर बाजारात बसून तोच आंबा आम्ही विक्री करतो. डझनमागे किंवा किलोमागे थोडा फार नफा मिळवून हा माल विक्री करायचा असतो. तो न खपल्यास नुकसानही सोसावे लागते. आता मोठ्या प्रमाणात आंबा दाखल
झाल्याने दर उतरला आहे.
- फिरोज तांबोळी आंबा विक्रेता
03204
Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01699 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..