टाकळीच्या दामू घोडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार दामू घोडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाकळीच्या दामू घोडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
दामू घोडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
टाकळीच्या दामू घोडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार दामू घोडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार

टाकळीच्या दामू घोडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार दामू घोडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार

sakal_logo
By

टाकळी हाजी, ता. १२ : येथील (ता. शिरूर) माजी सरपंच दामू धोंडीबा घोडे यांना संजीवनी शेती व शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले.
संगमनेर येथे शिवछत्रपती गुणीजन गौरव महासंमेलन २०२२ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन केले होते. एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापिका जयश्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. दीपकृष्ण ग्रामीण सहकारी बँकेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.
यावेळी संस्थेचे सहकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा, सांस्कृतिक, उद्योग, व्यवसाय अशा क्षेत्रामधून उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा राज्यस्तरीय शिवछत्रपती संजीवनी पुरस्कार देण्यात येतो. घोडे यांनी दहा वर्षे तर त्यांची पत्नी अरुणा घोडे यांनी पाच वर्षे असे सलग पंधरा वर्षे टाकळी हाजीचे सरपंच पद भूषविले आहे. गावासाठी रुग्णवाहिका, विविध विकास कामे, सामाजिक उपक्रम राबवून जनसामान्यांच्या प्रश्र्नासाठी ते नेहमी कार्यरत असतात.

03206

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01700 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top