
पावसाळ्यापूर्वी होणार १३ बंधाऱ्यांचे काम
टाकळी हाजी, ता. १२: ''''मलठण (ता. शिरूर) येथे मृदू व जलसंधारण उपविभागीय शिरूर अंतर्गत १३ सिमेंट बंधारे मंजूर झाले आहेत. त्यातील जवळपास २ बंधारे तयार तर ३ बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व १३ सिमेंटच्या बंधाऱ्यांचे काम होईल,'''' अशी ग्वाही शिरूर उपविभागीय मृदू व जलसंधारण विभागाचे जलसंधारण अधिकारी योगेश बांगर यांनी दिली.
मलठण (ता. शिरूर) येथे पावसाचेप्रमाण जेमतेम असले तरी गावालगत वेगवेगळ्या प्रकारचे ओढे वाहतात. पावसाळ्यात या ओढ्यांमधून पाणी वाहून जाते. या ओढ्यांवर सिमेंट बंधारे बांधले तर पाणीसाठा होऊन गावालगत असणाऱ्या या बंधाऱ्यांमधून पाण्याचे परक्युलेशन होऊन कूपनलिका व ओढ्यांना पाणी वाढेल. ही बाब ओळखून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मलठण (ता. शिरूर) येथील वेगवेगळ्या ओढ्यांवर १३ सिमेंट बंधारे गेल्या वर्षी मंजूर केले होते.
दरम्यान, उपविभागीय जलसंधारण अधिकारी हेमंत चव्हाण व विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाने पावसाळ्या पूर्वी या बंधाऱ्यांची कामे पुर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
स्थानिकांनी कामांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन
कोरोना काळात बंधाऱ्यांची कामे प्रस्तावित होती. बंधाऱ्यासाठी २३४.०३ लाख रुपये या कामांसाठी मंजूर झाल्याने ही सर्व कामे सुरू केली आहेत. या सिमेंट बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाळ्यातील पाणी साठवण होणार असून मलठण गाव दुष्काळमुक्त करण्याचे काम हे सिमेंट बंधारे करणार आहेत. भविष्यात फायदेशिर ठरणाऱ्या या बंधाऱ्याच्या कामांवर स्थानिक ग्रामस्थांनी लक्ष द्यावे, असे आवाहन स्थानिक ग्रामस्थ संतोष गायकवाड यांनी सांगितले.
राज्याचे गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या दुरदृष्टिमुळे या ओढ्यांवर सिमेंट बंधारे मंजूर करून घेण्यात आले. त्यातून ही सर्व कामे पुर्ण होत आहेत. पाणी आडवून पाणी साठवण झाल्यावर या भागातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
- मानसिंग पाचुंदकर अध्यक्ष आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस
63716
Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01702 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..