
निसर्गातील बदलाने दिसू लागले पक्षी
रांजणगाव गणपती, ता. १३ : मे महिन्याचा प्रचंड उकाडा सुरू असताना दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. निसर्गातील बदलत्या वातावरणाचा परिणाम पक्षांवर दिसू लागला आहे. त्यातच आता पावसाळा सुरु होणार असल्याने पक्ष्यांची घरटे बांधण्याची लगबग दिसून येत आहे.
पावसाळा सुरू होण्याच्या दरम्यान अनेक पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. हा पक्षांचा विणीचा काळ असतो. मात्र पक्ष्यांनी बनवलेली घरटी अनेकवेळा नैसर्गिक, मानवी घटनेची शिकार होतात. शेताच्या बांधालगत झाडाच्या पानात काटेरी झुडपात झाडाझुडपांत आपले संसार उभे केले असून सभोवतालच्या परिसरात ते मनसोक्त बागडताना दिसून येत आहेत. काही घरट्यांतून अंडी तर काहीतून चिमुकली पिल्ले दिसून येत आहेत. पिल्लं आढळणारी घरटी ही बुलबुल, वटवट्या, हळद्या, चिमणी, खंड्या म्हणजेच धिवर पक्षांची आहेत. सध्या कृष्ण, थिरथिरा, भारीट, तांबट, भुरळी, हळद्या, मोर, चष्मेवाला असे अनेक पक्षी दृष्टीस पडत असून परिसरात त्यांचा आवाज कानी पडतो. विविध प्रकारचे कीटक, किडे, मुंग्या पकडून आपल्या पिल्लांना चोचीत भरवताना त्यांचे कसब पाहणे अवर्णनीय असते.
जंगल तोडीमुळे पक्ष्यांच्या संख्येवर विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. पक्षी नैसर्गिक संकटांना तोंड देत स्थलांतर करतात. घरटी बांधण्यासाठी असलेली सुरक्षित झाडे नष्ट होत आहेत. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे त्यांच्या अधिवासावर दिवसेंदिवस परिणाम जाणवू लागला आहे. सध्या निसर्गात नविन पालवी व फुले बहरू लागल्याने वेगवेगळे पक्षी परिसरात दिसू लागले आहेत.
मनोहर म्हसेकर, वनअधिकारी शिरूर
Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01705 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..