गृहमंत्री वळसे पाटील आज शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गृहमंत्री वळसे पाटील आज 
शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर
गृहमंत्री वळसे पाटील आज शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर

गृहमंत्री वळसे पाटील आज शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर

sakal_logo
By

टाकळी हाजी, ता. १५ : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सोमवारी (ता. १६) शिरूर तालुक्यातील ३९ गावांच्या दौऱ्यावर येत असून विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्‍घाटनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे यांनी दिली.
गावडे म्हणाले, ‘‘शिरूर आंबेगाव मतदार संघात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नदीवरील पूल, रस्ते, सामाजिक सभागृह, शैक्षणिक सुविधा, जलसंधारणासाठी बंधारे, आरोग्य सुविधा यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे. यातील अनेक कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतिपथावर तर काहींचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
वळसे पाटील हे शिरूर तालुक्यात सोमवार (ता. १६) सकाळी नऊ वाजता करंदी येथून दौऱ्या‍ला सुरवात करणार असून त्यानंतर धामारी वरून दुपारी तीन वाजता जांबूत येथे जय मल्हार हायस्कूल इमारतीचा उद्‍घाटन समारंभ होणार आहे. त्यानंतर टाकळी हाजी (ता. शिरूर)गावाबाहेरील मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरण व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन, मलठण-टाकळी हाजी- वडनेर - या रस्त्यांचे भूमिपूजन तसेच घोडनदीवर टाकळी हाजी- निमगाव दुडे दरम्यान होणाऱ्या ५ कोटी ५० लाख रुपयांच्या पुलांचे तसेच निमगाव दुडे ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे आहेत. यावेळी आमदार अशोक पवार, दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी सभापती प्रकाश पवार, घोडगंगाचे उपाध्यक्ष रंगनाथ थोरात, भिमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे आदी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01710 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top