
जांबूतला मल्हार हायस्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
टाकळी हाजी, ता. १८ : विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी घेतलेले शिक्षण महत्वाचे ठरत असते. भौतिक सुविधांमधून
इमारती पाठोपाठ गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतय का? याकडे शिक्षक व पालकांनी लक्ष द्यावे, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
जांबूत (ता. शिरूर) येथील जय मल्हार हायस्कूलच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डिसीएम सोसायटीच्या जय मल्हार हायस्कूलची नवीन इमारत उभारणीस ग्रामस्थांनी भरभरून मदत दिली. त्यांचे आभार मानत मुख्याध्यापक कापसे यांचा सत्कार वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा दूधसंघाच्या अध्यक्ष केशर पवार, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटिल, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, संपत देवकाते, पांडुरंग पवार, मुख्याध्यापक आर. एस. कापसे, डॅा. खंडू फलके, शिवाजीराव धायगुडे, शरद जांभळकर, अरुणा घोडे, सुभाष पोकळे, जयश्री जगताप, सतीष फिरोदिया, वासुदेव जोरी, नाथा जोरी, पोपटराव फिरोदिया, बाळासाहेब पठारे, बाळकृष्ण कड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सुनील जाधव यांनी सूत्रसंचालन तर लहू गाजरे यांनी आभार मानले.
03231
Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01713 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..