
शिरूर - पहाडदरा एसटी सुरू करण्याची मागणी
टाकळी हाजी, ता. १७ ः शिरूर एसटी महामंडळाची शिरूर - पहाडदरा ही गाडी नेहमीच्या वेळात सुरू करण्याची मागणी शालेय विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. ही गाडी सुरू नसल्याने अनेक विद्यार्थी व नोकरदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कोरोना काळात एसटीचा प्रवास बंद झाला. शिरूर एसटी महामंडळाची शिरूर - पहाडदरा ही एसटी सायंकाळी शिरूर वरून साडेसहा सुटून ती मलठण- कवठे येमाई मार्गे लोणी पहाडदरा येथे मुक्कामी राहत होती. त्यानंतर ती सकाळी पुन्हा त्याच मार्गे शिरूर येथे पोहचत होती. त्यामुळे या मार्गावर असणारे विद्यार्थी व नोकरदार शिरूर येथील तालुकास्तरावर वेळेत पोहचत होते. सध्या एसटीचा प्रवास पुन्हा सुरू झाला असून याच वेळात ही शिरूर पहाडदरा एसटी सुविधा सुरू करण्यात यावी, अशी मागणी कवठे येमाई (ता. शिरूर) येथील साक्षी सांडभोर, आकांक्षा काळे, उमा उघडे, रिता घोडे या विद्यार्थिनी करू लागल्या आहेत. याबाबत लवकरच एसटी व्यवस्थापकांना अर्ज करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बाबत एसटी व्यवस्थापकांशी संपर्क होऊ शकला नाही.
Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01714 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..