जांबूत शाळेचा इंटरमिजिएटचा निकाल शंभर टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जांबूत शाळेचा इंटरमिजिएटचा निकाल शंभर टक्के
जांबूत शाळेचा इंटरमिजिएटचा निकाल शंभर टक्के

जांबूत शाळेचा इंटरमिजिएटचा निकाल शंभर टक्के

sakal_logo
By

टाकळी हाजी, ता. २१ ः महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जांबूत (ता. शिरूर) येथील जय मल्हार हायस्कूलचे २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेतील प्रविष्ट विद्यार्थ्यांमध्ये ए ग्रेड-१७, बी ग्रेड-१० तर सी ग्रेडमध्ये १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत ए ग्रेड- ७, बी ग्रेड- ५, सी ग्रेड- ३ सवलतीच्या गुणांचा फायदा होणार आहे.
विद्यार्थ्यांना कला शिक्षक मंगेश रत्नाकर व प्रशांत शितोळे यांचे मार्गदर्शन मिळाले. परीक्षेस मुख्याध्यापक आर. एस. कापसे, पर्यवेक्षक एस. बी. फिरोदिया, रमेश अर्जुन, सुदाम जगताप, सुनील जाधव, युवराज जगताप, अर्जुन आढाव यांचे सहकार्य मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01720 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..