जाई खामकर यांच्याकडून वैद्यकीय मदतीचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाई खामकर यांच्याकडून
वैद्यकीय मदतीचे आवाहन
जाई खामकर यांच्याकडून वैद्यकीय मदतीचे आवाहन

जाई खामकर यांच्याकडून वैद्यकीय मदतीचे आवाहन

sakal_logo
By

टाकळी हाजी, ता. २१ : मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा जाई खामकर यांचा डोक्याचा आजार बळावला असून, त्यांना उपचार घेण्यासाठी पुणे येथील खासगी रूग्णालयात दाखल केले असून, शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यासाठी मदतीचे आवाहन केले जात आहे.
खामकर यांनी दिव्यांग व दृष्टिहिनांसाठी देशातील पहिले न्यू व्हीजन कला वाणिज्य महाविद्यालय दोन सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे. त्या स्वतः दृष्टिहीन असून, समाजामध्ये त्यांनी आदर्श उभा केला आहे. त्यांना सध्या डोक्याचा आजार बळावला आहे. त्यांच्यावर डॉ. आनंद अलूलकर हे न्युरॅालॅाजीस्ट
उपचार करत आहे. उपचारासाठी खर्च येणार असून, त्यांना मदतीची गरज आहे. त्यासाठी ७७५७९ ६२४८८ या गुगल पे क्रमांकावर किंवा पुढील खात्यावर मदत पाठवावी- मळगंगा अंध अपंग संस्था, आयसीआयसीआय बॅंक, शाखा मलठण (ता. शिरूर), खाते क्रमांक- ६४९००५००३९८९, आयएफसी कोड- ICIC०००६४९०.

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01721 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..